¡Sorpréndeme!

राजकारणाचं युद्ध संपलय; हेमंत रासनेंना उद्देशून रवींद्र धंगेकराचं विधान | Ravindra Dhangekar

2023-03-11 4 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री कसबा गणपती (चौक) येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे नेते माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासनेंनी आपापल्या वेळेनुसार उपस्थिती लावली होती. त्यामुळे दोघांचीही भेट टळली. त्यानंतर धंगेकरांनी माध्यमांशी संवाद साधत राजकारणाचं युद्ध संपलं आता समाजकारणाचं युद्ध सुरू झालं आहे. त्यामुळे एकत्र हातात हात घालून काम करू, अशी ग्वाही यावेळी धंगेकरांनी दिली